ही स्थिती कोण आणि कधी पालटणार ?

देशात ३ कोटी ६० लाख खटले प्रलंबित आहेत. इतक्या मोठ्या संख्येने प्रलंबित खटले आणि न्यायाधिशांची कमतरता, हा न्यायाच्या मार्गातील मोठा अडथळा आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी केले आहे.

धर्मांधांकडून कधी अशी कृती होते का ?

युक्रेनमध्ये युद्ध भडकल्यानंतर तेथील नागरिकांच्या साहाय्यासाठी ‘इस्कॉन’ या आध्यात्मिक संस्थेने पुढाकार घेतला आहे. यासाठी युक्रेनमधील सर्व ५४ मंदिरे खुली करण्यात आली आहेत.

निधर्मीवादी आता गप्प का ?

आंध्रप्रदेशातील आत्मकूर पोलीस ठाण्यावर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात सहभागी झाल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मुख्य पोलीस हवालदार शेख अथाउल्लाह याला अटक केली. तो कर्तव्यावर असतांनाच त्याने पोलीस ठाण्यावर आक्रमण केले.

हिंदु राष्ट्राची अपरिहार्यता जाणा !

कथित पुरोगामी लेखिका शालीन मारिया लॉरेन्स यांनी ‘फेसबूक’वर ‘तमिळनाडूमध्ये भाजपची ‘वाढ’ रोखायची असेल, तर लोकांचे धर्मांतर करणे आवश्यक आहे’, असे मत प्रदर्शित केले आहे.

सर्वाेच्च न्यायालयाचा असा अनादर लज्जास्पद !

‘न्यायालयांच्या आदेशांचे पालन न केल्यास किंवा न्यायालयाला उत्तर सादर करण्यास विलंब झाल्यास सर्वोच्च न्यायालय राज्य सरकारकडून ५ सहस्र रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंत दंड वसूल करील’, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

अशा हिंदुत्वनिष्ठांचे रक्षण कोण करणार ?

‘बजरंग दलाचा कार्यकर्ता हर्ष याच्या हत्येमागील सर्वांत मोठे कारण म्हणजे तो एक हिंदु कार्यकर्ता होता आणि निडरपणे आवाज उठवत होता’, अशी स्पष्टोक्ती कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी ‘रिपब्लिक टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत केली.

पोलिसांचा हिंदुद्वेष जाणा !

छत्रपती शिवाजी महाराज कसायाचे हात कापतांनाचा इतिहास फेसबूकद्वारे प्रसारित केल्याच्या प्रकरणी धुळे येथील गोरक्षक संजय शर्मा, तसेच प्रणिल मंडलिक, जयेश पाटील आणि प्रदीप जाधव या हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी अटक केली.

पाकशी कोणतेही संबंध ठेवू नका !

भारतासमवेत व्यावसायिक नाते असणे, ही काळाची आवश्यकता आहे. यात दोन्ही देशांचा लाभ आहे, असे विधान पाकने केले आहे. काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यात आल्यानंतर पाकने भारतासमवेतचे सर्व व्यापारी संबंध संपुष्टात आणले होते.

केरळमधील भ्रष्ट कम्युनिस्ट सरकार !

‘केरळ सरकारचे मंत्री केरळच्या लोकांच्या पैशांचा दुरुपयोग करत आहेत’, असा आरोपही राज्याचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी विधानसभेतील भाषणात केला.

आम आदमी पक्षातील लाचखोर लोकप्रतिनिधी जाणा !

भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी स्थापन झालेल्या आम आदमी पक्षातही भ्रष्टाचारी आहेत. ‘आप’च्या नवी देहली येथील नगरसेविका गीता रावत यांना २० सहस्र रुपयांची लाच घेतांना केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआयने) अटक केली.