संपूर्ण देशात समान नागरी कायदा हवा !

उत्तराखंडमध्ये भाजपचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर समान नागरी कायदा राज्यात लागू करू, असे प्रतिपादन उत्तराखंडमधील भाजपचे मावळते मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांनी केले.

हे काँग्रेसच्या कर्माचे फळ आहे !

ज्या लोकांनी काँग्रेस पक्षाच्या उभारणीसाठी स्वतःचे आयुष्य वेचले आहे, त्या ज्येष्ठ नेत्यांना काँग्रेस पक्ष मरणपंथाला लागलेला पहावत नाही, असे उद्गार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये झालेल्या पराभवानंतर काढले.

अशांना आतंकवादी ठरवून कारवाई करा !

‘इक्रा आय.ए.एस्.’ या प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांना शिकवतांना शिकवणारे अधिवक्ता अवध प्रताप ओझा यांनी आतंकवादी ओसामा बिन लादेन याचे उदात्तीकरण केले आहे.  तसेच ‘इस्लाम तलवारीने नव्हे, तर शांततेने वाढला’, असेही म्हटले.

प्रशासनाला अशा घटना का दिसत नाहीत ?

चेन्नईच्या पेरांबूर बॅरेक्स रोडला लागून अरबी महाविद्यालयाच्या नावाने एक इमारत बांधण्यात आली असून तिचे हळूहळू मशिदीत रूपांतर केले जात आहे. या इमारतीच्या बाहेर १४ फूट उंच खांबावर ध्वनीक्षेपक लावण्यात आला आहे.

देशात किती भ्रष्टाचारी असतील ?

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने वर्ष २०२१ मध्ये महाराष्ट्रातील लाच घेणारे  १ सहस्र ७६ सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये २ कोटी ६४ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

अशा चित्रपटांवर बहिष्कारच हवा !

साजिद नाडियावाला निर्मित आणि फर्हद सामजी दिग्दर्शित ‘बच्चन पांडे’ या आगामी चित्रपटात ‘होली पे गोली’ असे आक्षेपार्ह वाक्य असल्याने हिंदूंकडून या चित्रपटाला सामाजिक माध्यमांद्वारे मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.

धर्मांध ख्रिस्त्यांचे धाडस जाणा !

तमिळनाडूतील शंकरानकोविल येथील मंदिराच्या मालकीच्या भूमीत एका ख्रिस्त्याचा मृतदेह दफन करण्याचा धर्मांध ख्रिस्त्यांचा प्रयत्न हिंदुत्वनिष्ठांनी हाणून पाडला.

अशा घटना लोकशाहीला कलंक लावतात !

मणीपूर विधानसभा निवडणुकीत झालेल्या हिंसाचारामध्ये आतापर्यंत २ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचाराची पहिली घटना थौबल जिल्ह्यात, तर दुसरी घटना सेनापती जिल्ह्यात घडली.

काँग्रेसच्या राज्यात हिंदु धर्मावरील आघात जाणा !

राजस्थानच्या रुपपुरा येथील शासकीय उच्च माध्यमिक शाळेतील निर्मला कामड या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना ‘हिंदुईझम् ः धर्म या कलंक ?’ या पुस्तकाचे वितरण केले. या प्रकरणी पालकांनी केलेल्या विरोधानंतर जिल्हा शिक्षण अधिकार्‍यांनी चौकशीचा आदेश दिला आहे.

हे आतापर्यंतच्या सर्वपक्षियांना लज्जास्पद !

बिहारच्या ३८ पैकी ३१ जिल्ह्यांतील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे एका अहवालात म्हटले आहे. अनेक भागांतील पाण्यामध्ये विषारी तत्त्वे आढळली आहेत. दूषित पाण्यामुळे त्वचाविकार, मूत्रपिंडाचे विकार आणि अन्य विकार जडू शकतात.