भाईंदर येथे संचारबंदीचा अपलाभ घेत गुटखा पुरवणार्‍याविरुद्ध गुन्हा नोंद

समाजास बाधक ठरणार्‍या व्यसनाधीनतेला वेळीच आळा बसायला हवा. पोलिसांनी यासाठी कठोर पावले उचलावीत, हीच अपेक्षा !

शासनाच्या संचारबंदीच्या आदेशाला तिलांजली

शासनाने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्यास २७ मार्चपासून अनुज्ञप्ती दिल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी दुकाने उघडी होती. गेले काही दिवस किराणा दुकाने बंद असल्याने लोकांनी किराणा माल खरेदी करण्यासाठी दुकानांमध्ये एकच गर्दी केली.

उत्तर गोव्यात ५, तर दक्षिण गोव्यात ४ विलगीकरण (क्वारंटाईन) केंद्रे

शासनाने उत्तर गोव्यात ५, तर दक्षिण गोव्यात ४ विलगीकरण (क्वारंटाईन) केंद्रे सिद्ध केली आहेत. परराज्यातून गोव्यात आलेल्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शासनाने केले आहे.

महानगरपालिकेला कोरोनाबाधित रुग्णाची माहिती न कळवणारे ठाणे येथील चाचणी केंद्र (लॅब) ‘सील’

कोरोनाबाधित व्यक्तींची माहिती तत्परतेने प्रशासनास देणे, समाजाच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक आहे. यात निष्काळजीपणा किंवा मनमानीपणा करणार्‍यांवर कठोर कारवाई व्हायला हवी !

‘कोरोना’च्या भीतीने आधुनिक वैद्य आणि रुग्णालयातील कर्मचारी यांना घरमालकांकडून घर रिकामे करण्यासाठी तगादा

देशभरात थैमान घालणार्‍या कोरोना विषाणूपासून जनतेचे रक्षण करण्यासाठी आधुनिक वैद्य आणि पोलीस यंत्रणा महत्त्वाची भूमिका बजावत आहेत………

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘नाशिक रस्ता मध्यवर्ती कारागृहा’तील ५७ बंदीवानांची वैयक्तिक जातमुचलक्यावर सुटका

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘नाशिक रस्ता मध्यवर्ती कारागृहा’तील छोट्या गुन्ह्यांतील ५७ बंदीवानांना वैयक्तिक जातमुचलक्यावर गेल्या ३ दिवसांत सोडण्यात आले…

कोरोनाची संख्या हळूहळू न्यून होईल ! – डॉ. के. श्रीनाथ रेड्डी, अध्यक्ष, ‘पब्लिक हेल्थ फाऊंडेशन ऑफ इंडिया’

देशात दळणवळण बंदी आणि ‘सोशल डिस्टन्सिंग’ (एकमेकांपासून सुरक्षित अंतर राखणे) केल्याने कोरोनाचा संसर्ग बर्‍याच प्रमाणात रोखता येईल……

लोकांना जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळतील, घरीच थांबावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

गोव्यातजीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याचा निर्णय मागे घेण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर झालेली आहे; मात्र केंद्राने दिलेल्या नियमांच्या आधारावर ही दुकाने उघडी ठेवण्यात येणार आहेत.

जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गोव्यात नागरिकांच्या मोठ्या रांगा

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने उघडी ठेवण्याचा घेतलेला निर्णय त्वरित मागे घ्यावा आणि संचारबंदीचे कठोरतेने पालन करावे, ही मागणी जोर धरत आहे. राज्यातील विविध क्षेत्रांतील लोक आता ही मागणी करू लागले आहेत.