‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा १२ सहस्र ९०० हून अधिक सरकारी महिला कर्मचार्यांनी अपलाभ घेतला, असे ‘माहिती अधिकारा’तून उघड झाले. त्यामुळे योजनेतील अपात्र लाभार्थ्यांची संख्या १ लाखांहून अधिक झाली आहे. ‘महिला आणि बालविकास विभागा’ने अशा कर्मचार्यांवर कारवाई करण्याचा आदेश दिला आहे. सरकारी कर्मचारीच नियमांचे पालन करत नसतील, तर ते जनतेकडून नियमांचे पालन कसे करून घेणार ? सरकारने गरीब जनतेसाठी केलेल्या योजनेचा लाभ सरकारी कर्मचार्यांनीही घ्यावा, यासारखे दुसरे लज्जास्पद काय असेल ?
सध्या या योजनेचा लाभ २ कोटी ४ लाख महिला घेत आहेत. या योजनेचा लाभ घेणार्या महिलांमध्ये चारचाकींमधून फिरणार्या, पोलीस खात्यातील, उद्योगपतींच्या पत्नी यांचा समावेश आहे, असेही मध्यंतरी उघड झाले होते. या योजनेचा लाभ गरजू महिलांनी न घेता अन्य महिला घेत आहेत, अशी अनेक प्रकरणे यापूर्वी समोर आली होती. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ खरोखर गरजू महिलांना होत आहे का ?’, असा प्रश्न निर्माण झाला. या योजनेतील लाडक्या बहिणींची संख्या न्यून करण्यासाठी ‘ई-केवायसी’ (स्वतःची ओळख पटवण्यासाठी कागदपत्रे ऑनलाईन जमा करणे) करण्यासाठी मुदत दिली होती. ती आता संपली. आता अधिकची मुदत मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे आणखी ६० लाख लाडक्या बहिणी यातून बाहेर पडण्याची शक्यता आहे. एकंदरच अर्जांची योग्य ती छाननी आणि निकष पडताळणी न करता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरसकट साहाय्य देण्याची घाई झाली, हे आता स्पष्ट झाले.
या योजनेमुळे सरकारला प्रतिमाह ३ सहस्र ७०० कोटी रुपयांचा व्यय येत आहे. याचा लाभ घेणार्यांमध्ये विविध स्तरांतील अपात्र महिलांचा समावेश असल्याने सहस्रो रुपये अपात्र महिलांना गेले. जनतेच्या करातून दिला जाणारा योजनांचा पैसा अपात्र लोकांना मिळणे किती संतापजनक आहे. कुणालाही घरी बसून दीड सहस्र रुपये मिळतील, तर त्यातून ती व्यक्ती कृतीशील होणार कि आळशी ? खरेतर देशाची प्रगती होण्यासाठी जनतेला कृतीशील बनवणारे शासनकर्ते हवेत; परंतु दुर्दैवाने तसे होतांना या योजनेतून तरी दिसत नाही. याचे जनतेलाही काही सुवेरसुतक नाही; कारण ‘जसा राजा तशी प्रजा !’, या उक्तीप्रमाणे जनताही याचा विचार करत नाही. याचा परिणाम काही काम न करता कसा पैसा मिळेल किंवा कुणाला तरी लुबाडून कसा पैसा मिळेल, अशी विचारसरणी असणारी जनता निर्माण होत आहे. हे सर्व पालटण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना होणे आवश्यक
– वैद्या सुश्री माया पाटील, सनातन आश्रम, देवद, पनवेल.


तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद
दोडामार्ग येथे सेवानिवृत्त वृद्ध व्यक्तीची २ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक
संपादकीय : सरकारची ऑनलाईन फसवणूक !
देवाला नैवेद्य दाखवून स्वतःच खायचा ! काय अर्थ आहे मग त्या नैवेद्य दाखवण्याचा ?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या दुहेरी नागरिकत्वप्रकरणी प्रयागराज (उत्तरप्रदेश) उच्च न्यायालयाच्या लक्ष्मणपुरी खंडपिठासमोर पेच !
सनातन धर्माला संपवणारे तुम्ही कोण ?