
तुळजापूर – श्री तुळजाभवानीदेवीच्या शाकंभरी नवरात्र महोत्सवांतर्गत २९ डिसेंबर या दिवशी रथअलंकार महापूजा भक्तीभावात साजरी झाली. भगवान श्री सूर्यनारायणांनी देवीस त्रिलोक भ्रमणासाठी आपला रथ अर्पण केल्याच्या स्मरणार्थ ही विशेष पूजा करण्यात येते. या पूजेनिमित्त श्री तुळजाभवानीदेवीचे भावपूर्ण दर्शन भाविकांना लाभले.
देवीच्या एका हातात चाबूक, तर दुसर्या हातात घोड्यांचा लगाम धारण केलेला अलंकार विशेष आकर्षण ठरला. देवीचे तेजस्वी आणि ऐश्वर्यपूर्ण स्वरूप अधिक खुलून दिसत होते. मंदिर परिसरात भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. संपूर्ण परिसर ‘आई तुळजाभवानी’च्या जयघोषाने दुमदुमून गेला.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान