
१. श्री. सुब्रह्मणियम् वेंकट, कोची, केरळ.
अ. ‘यंदाच्या (वर्ष २०२५ च्या) गुरुपौर्णिमेला आम्हा उभयतांना (मला आणि माझ्या पत्नीला) गुरुपूजा करण्याची संधी मिळाली. पूजा करतांना मला सूक्ष्मातून साक्षात् सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवता आले.
आ. माझे मन गुरुपौर्णिमेच्या १ – २ दिवस आधीपासून अस्वस्थ होते. त्या वेळी मला स्वप्नात गुरुदेवांचे दर्शन झाले. स्वप्नात गुरुदेव मला आश्वस्त करत ‘सर्व ठीक होणार’, असे म्हणाले. तेव्हा मला पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि आनंद अनुभवता आला.’
२. सुश्री रश्मी परमेश्वरन् (आध्यात्मिक पातळी ६६ टक्के, वय ४८ वर्षे), केरळ

२ अ. गुरुदेवांना प्रार्थना केल्यावर गुरुकृपेने साधकांना त्यांच्यासाठी आवश्यक असलेली सेवा देता येणे : ‘गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाचे नियोजन करतांना माझ्याकडून गुरुदेवांना ‘प्रत्येक साधकाला त्याच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी आवश्यक असलेली सेवा दिली जाऊ दे’, अशी प्रार्थना होत होती. त्याप्रमाणे मी साधकांना विविध सेवांचे दायित्व दिले. नंतर सूत्रसंचालनाची सेवा ज्या साधिकेला दिली होती, तिने सांगितले, ‘‘मला ही सेवा करण्याची तळमळ होती. मी ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’च्या वेळीही ‘सूत्रसंचालन कसे करतात ?’, हेच पहात होते.’’ ज्या साधिकेला ग्रंथप्रदर्शनाचे दायित्व देण्यात आले होते, तिला त्या सेवेतील अन्य बारकावे शिकता आले. ‘गुरुदेवांनी माझ्यासाठी आवश्यक असलेली सेवा दिली’, असे तिलाही वाटले.
गुरुपूजनासाठी एक साधक जोडपे निवडले होते. त्यातील पत्नीमध्ये आध्यात्मिक भाव होता; पण पती नवीन साधक होते. त्यांना संस्था किंवा प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी अधिक माहिती नव्हती. तेव्हा ‘ते भावपूर्ण गुरुपूजन करतील का ? त्यांना पूजेसाठी निवडून मी चूक केली का ?’, असे विचार माझ्या मनात येत होते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी पूजा करतांना त्या साधकाची पुष्कळ भावजागृती झाली. नंतरही त्याविषयी बोलल्यावर त्यांच्या डोळ्यांत अश्रू येत होते.
या प्रसंगांतून मला ‘प्रत्येक साधकाला जे आवश्यक आहे, ते गुरुदेव देत आहेत. तेच प्रत्येक साधकाला साधनेत पुढे नेत आहेत’, याची प्रचीती आली आणि मला गुरुदेवांबद्दल पुष्कळ कृतज्ञता वाटली.
२ आ. पावसाचे दिवस असूनही प्रसारासाठी बाहेर पडल्यावर पाऊस न येणे : केरळ राज्यात जूनपासून नोव्हेंबरपर्यंत पाऊस असतो. त्यात जुलैमध्ये थोडा अधिकच पाऊस असल्याने साधकांना प्रसाराच्या सेवेला जाणे कठीण जाते; मात्र या वर्षी ‘प्रसारासाठी बाहेर निघाल्यावर पाऊस येत नव्हता’, असे सर्वांनी अनुभवले.’
३. कु. हर्षा हरीन्द्रन्, केरळ
३ अ. सूत्रसंचालनाची सेवा आत्मविश्वासाने करता येणे : ‘गेल्या वर्षी मला व्यासपिठावर जाऊन साधनेतील प्रयत्नांविषयी बोलायची संधी मिळाली होती. तेव्हा मी अनेक स्वयंसूचना सत्रे केल्यानंतर व्यासपिठावर जाऊन बोलू शकले; मात्र या वर्षी मला व्यासपिठावर सूत्रसंचालनाची सेवा करण्यास आणि लोकांना सामोरे जाण्यास भीती वाटली नाही. आतापर्यंत मला असे आत्मविश्वासाने कधीच बोलता आले नव्हते.’
४. सौ. सिंधु राकेश, केरळ
४ अ. नारळाच्या झाडावरून अनेक नारळ आपोआप खाली पडल्याने गुरुपूजनासाठी नारळ मिळणे : ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘गुरुपूजनासाठी लागणारा नारळ मिळाला नाही’, असे मला कळले. तेव्हा ‘आमच्या घरी नारळाची झाडे आहेत. तेथून नारळ काढण्याचा प्रयत्न करूया’, असे मी ठरवले. नंतर यजमानांनी सांगितले, ‘‘नारळाच्या झाडावरून अनेक नारळ आपोआप खाली पडले आहेत.’’ ते ऐकून मला पुष्कळ आश्चर्य वाटले.
४ आ. ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची ध्वनी-चित्रचकती पहातांना भावजागृती होणे : गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’ची ध्वनी-चित्रचकती दाखवल्यावर मला पुन्हा तो सर्व महोत्सव अनुभवल्यासारखे वाटले. महोत्सवात मला पादुकांचे दर्शन घेतांना जो भाव जाणवला होता, तो ध्वनी-चित्रचकती पहातांनाही अनुभवता आला आणि पुष्कळ कृतज्ञता वाटून माझी भावजागृती झाली. माझ्या डोळ्यांतून भावाश्रू वहात होते.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : २९.७.२०२५)
| येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |
यज्ञाला विरोध करणार्यांनी, हे लक्षात घ्यावे !
सहनशील आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणार्या शिरसई, तालुका बार्देश, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. (सौ.) रंजना सिनारी (वय ७६ वर्षे) !
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या शिबिरात साधिकेला जाणवलेली सूत्रे आणि आलेली अनुभूती
प्रभादेवी (मुंबई) येथे झालेल्या ‘श्री राजमातंगी महायज्ञा’च्या संदर्भात कोची (केरळ) येथील सेवाकेंद्रातील साधकांना आलेल्या अनुभूती !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरणाची सेवा अविरतपणे आणि भावपूर्ण करणारे शिरोडा (फोंडा, गोवा) येथील श्री. धर्मा नाईक (वय ७५ वर्षे) !