सर्वत्रच्या साधकांना सूचना !
‘३.१०.२०२४ या दिवसापासून नवरात्रीला आरंभ होत आहे. या काळात सर्वत्र देवीची आराधना मोठ्या प्रमाणावर केली जाते. सनातन संस्थेने देवीविषयी अध्यात्मशास्त्रीय ज्ञान देणारे ग्रंथ, लघुग्रंथ, तसेच देवीतत्त्वाची अनुभूती देणारी चित्रे आणि नामपट्ट्या यांची निर्मिती केली आहे. नवरात्रीच्या काळात देवीची आराधना शास्त्रशुद्ध पद्धतीने करता येऊन भक्तांना देवीतत्त्वाचा लाभ अधिकाधिक व्हावा, या दृष्टीने हे ग्रंथ आणि उत्पादने समाजापर्यंत पोचवणे आवश्यक आहे.
१. देवीशी संबंधित असलेले ग्रंथ आणि लघुग्रंथ
१ अ. ‘शक्ती’ची उपासना कशी करावी ?, याविषयीची माहिती देणारे ‘शक्तीचे प्रास्ताविक विवेचन’ आणि ‘शक्तीची उपासना’ हे ग्रंथ ! : या २ ग्रंथांत शक्तीची विविध नावे, तिचे प्रकार आणि कार्य, देवीच्या उपासनेची वैशिष्ट्ये, तसेच मूर्तीविज्ञान विशद केले आहे. यासह ‘कोणत्या रांगोळ्या काढल्यावर शक्तीतत्त्व आकृष्ट होते ? काळानुसार कोणत्या देवीची उपासना करावी आणि ती कशी करावी ? नवरात्रोत्सव कसा साजरा करावा ?’, याविषयीची अमूल्य माहिती यांत दिली आहे. (याविषयीचा लघुग्रंथही उपलब्ध आहे.)
१ आ. देवी उपासनेविषयी ज्ञान देणारा लघुग्रंथ – ‘देवीपूजनाचे शास्त्र’ : या लघुग्रंथात ‘नवरात्रीत घटस्थापना कशी करावी ? दसर्याला अपराजितादेवीचे पूजन का करावे ? देवीच्या मूर्तीवर ‘कुंकूमार्चन’ का करतात ?’ आदी माहिती सविस्तर दिली आहे.
२. सनातनची अन्य सात्त्विक उत्पादने
२ अ. शक्तीतत्त्व असलेले चित्र : सनातन-निर्मित श्री दुर्गादेवीच्या सात्त्विक चित्रामध्ये ३०.५ टक्के देवीचे तत्त्व आकृष्ट झाले आहे. (कलियुगात मूर्ती किंवा चित्र यांमध्ये सरासरी ३० टक्के एवढ्या प्रमाणातच देवतेचे तत्त्व येऊ शकते. इतरत्र उपलब्ध असलेल्या देवतेच्या चित्रात हे तत्त्व सरासरी २ – ३ टक्के एवढेच असते.) हे चित्र लहान, मध्यम आणि मोठ्या या आकारांमध्ये उपलब्ध आहे.
२ आ. ‘शिव-दुर्गा’ आणि ‘श्रीकृष्ण-लक्ष्मी’ या देवतांची चित्रे असलेले पदकही (लॉकेटही) उपलब्ध आहेत.
२ आ. नामपट्टी : अक्षर सात्त्विक असल्यास त्यात चैतन्य असते. सात्त्विक अक्षरे आणि त्यांच्या भोवतालची देवतेच्या तत्त्वाला अनुरूप अशी चौकट यांचा अभ्यास करून सनातनने विविध देवतांच्या नामजपाच्या पट्ट्या बनवल्या आहेत.’ (८.९.२०२४)
वरील ग्रंथांसह पुढील ग्रंथ आणि लघुग्रंथ यांचेही वितरण करता येईल !१. ग्रंथअ. सण साजरे करण्याच्या योग्य पद्धती आणि शास्त्र आ. धार्मिक उत्सव आणि व्रते यांमागील शास्त्र इ. अलंकाराचे महत्त्व ई. स्त्री पुरुषांचे अलंकार उ. बिंदीपासून कर्णभूषणांपर्यंतचे अलंकार (अलंकारांविषयीचे शास्त्र अन् सूक्ष्मातील प्रयोग !) २. लघुग्रंथअ. आरतीसंग्रह (आरत्यांच्या अर्थासह) आ. सात्त्विक रांगोळ्या |