Britain Investigating Mosques : ब्रिटनमध्‍ये पाकिस्‍तानी वंशाच्‍या मुसलमानांकडून चालवण्‍यात येणार्‍या २४ मशिदींची चौकशी चालू !

मशिदींमधून ‘इस्रायलचा नाश करणे’, ‘ज्‍यूंना मारणे’ आणि ‘अल्लासाठी युद्ध करणे’ असे हिंसक संदेश देण्‍यात आले !

प्रातिनिधिक छायाचित्र

लंडन (ब्रिटन) – ब्रिटनमध्‍ये द्वेषपूर्ण भाषणांद्वारे मुसलमानेतरांच्‍या विरोधात फतवे काढण्‍यात आल्‍याच्‍या आरोपाखाली २४ मशिदींची चौकशी चालू झाली आहे. या मशिदी लंडन, बर्मिंगहॅम, लिव्‍हरपूल आणि मँचेस्‍टर या शहरांमध्‍ये आहेत. या मशिदींमधून दिल्‍या जाणार्‍या प्रवचनांमध्‍ये ‘इस्रायलचा नाश करा’, ‘ज्‍यूंना ठार मारा’ आणि ‘अल्लासाठी युद्ध करा’ असे हिंसक संदेश देण्‍यात आले होते. विशेष म्‍हणजे या मशिदी पाकिस्‍तानी वंशाचे लोक चालवतात. जुलैमध्‍ये मजूर पक्षाचे देशात सरकार सत्तेत आल्‍यानंतर चौकशीचे आदेश देण्‍यात आले.

१. या मशिदींमधून आतंकवादी संघटना हमास आणि तिचे आतंकवादी यांचे या भाषणांतून समर्थन करण्‍यात आल्‍याचाही आरोप आहे. या प्रकरणात दोष सिद्ध झाल्‍यास संबंधितांना १४ वर्षांपर्यंतच्‍या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

२. गाझामध्‍ये इस्रायलसमवेत युद्ध चालू झाल्‍यापासून या मशिदींमधून द्वेष पसरवण्‍याच्‍या अनेक तक्रारी येत होत्‍या. इस्रायल आणि ज्‍यू यांच्‍या विरोधात विष पसरवणार्‍या मौलवी (इस्‍लामचा धार्मिक नेता) आणि धर्मोपदेशक यांना आमंत्रित केल्‍याचा या मशिदींवर आरोप आहे.

३. या प्रकरणाची चौकशी करणार्‍या धर्मादाय आयोगाच्‍या प्रमुख हेलन स्‍टीफनसन यांनी सांगितले की, आम्‍ही याची चौकशी करत आहोत आणि नियमांचे उल्लंघन करणार्‍या मशिदींचा धर्मादाय दर्जा काढून घेतला पाहिजे का ?, यावरही विचार करत आहोत.

४. बर्मिंगहॅमच्‍या महंमदी मशिदीतील मौलवी अबू इब्राहिम हुसेन याने ज्‍यूंविरुद्ध केलेले द्वेषपूर्ण भाषण सामाजिक माध्‍यमांतून प्रसारित झाले होते. त्‍याने मशिदीमध्‍ये नमाजपठण करण्‍यास आलेल्‍यांना म्‍हटले होते की, माझ्‍या मागे एक ज्‍यू आहे, त्‍याला मारून टाका.

५. लंडनमधील तौहीद मशिदीचा मौलवी शेख सुहैब हसन याने हमासच्‍या इस्रायलवरील आक्रमणाचे समर्थन केले होते.

६. लिव्‍हरपूलमधील मशिदीत एका मौलवीने सांगितले की, जर ३ अरब देशांनी  इस्रायलवर आक्रमणे केले, तर तो भाग पूर्णपणे नष्‍ट होईल.

७. बर्मिंगहॅमच्‍या ग्रीन लेन मशिदीचा मौलवी जकाउल्लाह सलीम याने इस्रायली सैनिकांच्‍या मृत्‍यूसाठी प्रार्थना केली होती.

८. ब्रिटनच्‍या मशिदींमध्‍ये दिलेल्‍या द्वेषपूर्ण प्रवचनांचा एक संच अनेक ज्‍यू कार्यकर्त्‍यांनी संकलित केला आणि तो ब्रिटीश पोलिसांना देण्‍यासह सार्वजनिक केला आहे.

संपादकीय भूमिका

  • भारतातील मशिदींमध्‍ये कोणते संदेश दिले जातात ? याची माहिती गुप्‍तचर, पोलीस घेत आहेत का ? आणि काही आक्षेपार्ह असल्‍यास कारवाई केली जाते का ? असे प्रश्‍न यावरून उपस्‍थित होतात !
  • ब्रिटनमध्‍ये इस्रायलच्‍या विरोधात कारवाया करणार्‍या मशिदींवर कारवाई होते; मात्र तेथे खलिस्‍तानी भारतविरोधी, तर तेथील धर्मांध मुसलमान हिंदुविरोधी हिंसाचार करतात, त्‍यांच्‍यावर कठोर कारवाई का होत नाही ?