ताम्हिणी घाटातील धबधब्यात उडी मारलेल्या तरुणाचा मृतदेह रायगड जिल्ह्यात सापडला !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – येथील ताम्हिणी घाटात स्वप्नील धावडे हा तरुण आपल्या जिममधील ३२ जणांच्या गटासमवेत फिरण्यासाठी गेला होता. धावडे याने २९ जून या दिवशी ताम्हिणी घाटातील ‘प्लस व्हॅली’ येथे पाण्यात उडी मारली. सतत पडणार्‍या पावसामुळे ताम्हिणी घाटातील प्लस व्हॅलीच्या कुंडांमध्ये पाण्याचा प्रवाह वाढला आणि त्यामध्ये तो बेपत्ता झाला. १ जुलै या दिवशी त्याचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील माणगाव येथे आढळून आला.