पुन:पुन्हा फेसाळत आहे इंद्रायणी नदी !

इंद्रायणी नदी

पुणे – तीर्थक्षेत्र आळंदीतील (पुणे) भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पवित्र इंद्रायणी नदीला वाढत्या अस्वच्छतेने, जलप्रदूषणाने ग्रासले आहे. इंद्रायणी नदीत पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतून रसायन आणि मैलामिश्रित सांडपाणी थेट सोडले जात असल्याने नदीच्या पाण्यावर गेले २ दिवस फेस धरला आहे. यामुळे भाविक, नागरिक यांच्यात नाराजीचा सूर उमटत आहे. (नदीच्या प्रदूषणाविषयी वांझोट्या चर्चा, परिषदा घेणारी पुरोगामी मंडळी आता झोपली आहेत का ? प्रशासन या प्रदूषणाविषयी पावले उचलत नसल्यामुळे दायित्व निश्चित करून अधिकार्‍यांवरही कारवाई होणे आवश्यक आहे ! प्रदूषणकारी कारखाने, व्यक्ती यांच्यावर कठोर कारवाई केल्याविना ही समस्या सुटणार नाही ! – संपादक)