मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईत सावत्र पित्याला अटक !

प्रतिकात्मक चित्र

मुंबई – गोरेगाव येथे १२ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी ४ मे या दिवशी मुंबई पोलिसांनी एका पित्याला अटक केली आहे. बलात्कार आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून तिच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.