लंडन – पाकिस्तानी वंशाचे नेते सादिक खान यांनी तिसर्यांदा लंडनचे महापौरपद पटकावले आहे. इंग्लंड आणि वेल्स येथील निवडणुकांमध्ये मजूर पक्षाने चांगली कामगिरी केली आहे. मजूर पक्षाचे नेते सादिक खान यांनी त्यांचे कंझर्वेटिव्ह प्रतिस्पर्धी सुसेन हॉल यांचा ४७. ७ टक्के मतांनी पराभव केला. खान यांनी ‘एक्स’वर एक ‘पोस्ट’ प्रसारित करून लंडनवासियांचे आभार मानले आहेत. ‘लंडन शहर अधिक सुंदर, सुरक्षित आणि हरित शहर बनवण्यासाठी अथक परिश्रम करीन’, असे खान यांनी म्हटले आहे.
Leading our nation’s capital is one of the greatest privileges of my life. Thank you for the opportunity to serve you for another four years.
Let’s continue to build a better London for everyone—a city that is fairer, safer, greener, more prosperous and more affordable for all. pic.twitter.com/wLySHPxrbx
— Mayor of London, Sadiq Khan (@MayorofLondon) May 4, 2024