मुंबई – हिंदी भाषेतील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट २२ मार्च या दिवशी जगभरात प्रदर्शित झाला. याच दिवशी तो मराठी भाषेतही प्रदर्शित होणार होता; मात्र ‘केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळा’ने (‘सेन्सॉर बोर्डा’ने) हिंदी भाषेतील चित्रपटाला अंतिम क्षणी प्रमाणपत्र दिल्यामुळे मराठी भाषेसाठी अर्ज करण्यासाठी वेळ मिळू शकला नाही. हिंदीनंतर मराठी चित्रपटासाठी अर्ज करण्याचा नियम आहे. यामुळे एक आठवडा विलंबाने, म्हणजे २९ मार्च या दिवशी आता मराठीतील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर’ चित्रपट प्रदर्शित होत आहे.