गैरप्रकारांच्या पार्श्वभूमीवर राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय !
नागपूर – राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी, तसेच बारावीच्या परीक्षेमध्ये होणार्या गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी एका शाळेतील विद्यार्थ्यांना एका शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर विभाजित केले जाणार आहे. त्यामुळे एका परीक्षा केंद्रावर एकाच शाळेतील विद्यार्थी रहाणार नसल्याने ‘समूह कॉपी’ला आळा बसणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक, श्रेणी, मौखिक आणि अंतर्गत मूल्यमापन परीक्षा चालू आहेत. या परीक्षा २० फेब्रुवारीपर्यंत तर लेखी परीक्षा २१ फेब्रुवारी ते ११ मार्च या कालावधीत पार पडेल. इयत्ता दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २९ फेब्रुवारीपर्यंत, तर लेखी परीक्षा १ ते २६ मार्च या कालावधीत घेतल्या जातील.