चित्रीकरणासाठी सरकारी आणि सार्वजनिक जागा निःशुल्क उपलब्ध करून देणार !

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर यांचा निर्णय !

सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर

मुंबई – राज्यात सरकारी आणि सार्वजनिक जागा चित्रीकरणासाठी निःशुल्क उपलब्ध करून देणार, हा निर्णय सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी दिला. या प्रकरणातील नियमावलींना अंतिम स्वरूप देण्याचे काम सध्या चालू आहे. मराठीसह इतर भाषांच्या चित्रपटांना ही सवलत लागू असेल.

राज्य सरकार मराठी चित्रपट आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित कलावंत, तंत्रज्ञ यांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. चित्रीकरणासाठी शुल्क देण्याविषयी अनेक अडचणी येत असल्याने चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते वेळोवेळी अडचणी मांडत होते. याविषयी शासनस्तरावर चर्चा करून वरील निर्णय घेण्यात आला.