अभिनेत्याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंद !

नाशिक – ‘यूट्यूब’वर अहिराणी भाषेतील ‘हाई झुमका वाली पोरं’ या प्रसिद्ध झालेल्या गाण्याचे अभिनेता विनोद उपाख्य सचिन अशोक कुमावत यांच्यावर बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांनी विवाहाचे आमीष दाखवून ३० ऑगस्ट २०२२ ते १७ जानेवारी २०२३ या कालावधीत वेगवेगळ्या ठिकाणी पीडित तरुणीवर शारीरिक अत्याचार केले.

संपादकीय भूमिका 

अशांना कठोर शिक्षा व्हायला हवी ! अभिनेत्याने असे प्रकार करणे म्हणजे मनोरंजन क्षेत्रासाठी लाजिरवाणेच आहे !