पुणे – महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण पडताळणीचे (सर्वेक्षण) काम चालू आहे. याची समयमर्यादा ३१ जानेवारी अशी होती; परंतु काही ठिकाणी पडताळणी करण्यास आणखी वेळ लागणार असल्याने पडताळणी २ फेब्रुवारीपर्यंत करण्याची समयमर्यादा देण्यात आली आहे, अशी माहिती आयोगाकडून दिली आली.
पडताळणी दरम्यान केवळ मराठा समाज, खुल्या प्रवर्गातील कुटुंबाची माहिती भ्रमणभाषमधील उपयोजनमध्ये (अॅप) प्रश्नावलीद्वारे भरली जात आहे. कुटुंब आरक्षित प्रवर्गातील असल्यास त्यांची माहिती घेतली जात नाही. नागरिकांनी पडताळणीसाठी येणार्या प्रगणकांना साहाय्य करावे, आवश्यक ती माहिती योग्य शब्दांमध्ये द्यावी, असे आवाहन आयोगाकडून करण्यात येत आहे.