पुणे – यंदा धरणातील पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये अल्प आहे. ही परिस्थिती महाराष्ट्रामध्ये सर्वत्र दिसून येत आहे. सध्या पुणेकरांना पाण्याची चिंता करायला लावू नका. फेब्रुवारीमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन काय करायचे ते ठरवू, असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते पुणे ‘सर्किट हाऊस’ येथे माध्यमांशी संवाद साधतांना बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘‘मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये संपूर्ण राज्यातील पाण्याच्या स्थितीची कल्पना दिली आहे. या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदामंत्री म्हणून ‘पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊ, त्यानंतर शेतीला पाणी द्या’, अशी सूचनाही केली आहे. फेब्रुवारीमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन एप्रिल ते जून या ४ मासांचे नियोजन कसे करता येईल, याचा आढावा घेतला जाईल.’’