भाजपला बहुमत मिळाल्यास घटनेत पालट करतील ! – प्रकाश आंबेडकर

मुंबई – दुर्दैवाने नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लढणारे कुटुंबाला प्राधान्य देणारे आहेत. त्यामुळे आपण कितीही डोके आपटले तरी त्यांची एकी होणे कठीण आहे. आम्ही आमचे स्वतंत्र उमेदवार ४८ जागांवर उभे करू, असे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ॲड्. प्रकाश आंबेडकर वंचित महाआघाडीच्या मेळाव्यात घोषित केले.  संविधानाच्या बाजूने आणि संविधानाच्या विरोधात असे गट पडले असतांना आपणास ठोस भूमिका घेतली पाहिजे. भाजपला दोन-तृतीयांश बहुमत मिळाल्यास घटनेत बदल करतील. त्यामुळेच भाजप या बहुमतापर्यंत पोचणार नाहीत याची सर्वांनी काळजी घ्यावी, अशी चेतावणी आंबेडकर यांनी या वेळी दिली. त्यानंतर मविआसमवेत आंबेडकर यायला हवेत, असे संजय राऊत म्हणाले, तसेच काँग्रेसनेते वडेट्टीवार यांनीही आंबेडकरांनी मविआमध्ये यायला हवे, असे म्हटले आहे.