पुणे – शिरूरमध्ये पर्याय देणार आणि खासदार अमोल कोल्हे यांना लोकसभेत पाडणारच, असा निर्धार उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी घोषित केला आहे. ते उत्तम कलाकार आहेत; परंतु त्यांनी मतदारसंघात ५ वर्षे दुर्लक्ष केले. त्यांनी राजीनामा देतो, असे सांगितले. ‘निवडणूक जवळ आली की, पदयात्रा सुचत आहे’, अशी टीका त्यांनी कोल्हे यांच्यावर केली आहे.
निवडणुकीत कुणाच्या बाजूने उभे रहायचे, हे सर्वसामान्य जनता ठरवेल की, ती मूल्यांच्या बाजूने उभी रहाणार कि सत्तेच्या बाजूने उभे रहाणार ? शरद पवार यासंदर्भात जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल. सत्ता हे माध्यम असते. ज्यांना सत्ता हे साधन असते, असे वाटते त्यांना सत्ता महत्त्वाची वाटते. अशी प्रतिक्रिया शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी यावर दिली आहे. मला शिरूरच्या रिंगणात उतरवले तर १०० टक्के मी या भागाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निवडणूक लढीन.