सातारा – ढोल-ताशांचा गजर, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष, झांज, तुतारी यांच्या निनादात प्रतापगड येथे ‘शिवप्रतापदिन’ १९ डिसेंबर या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी आणि शिवकालीन धाडसी खेळांची प्रात्यक्षिके हे कार्यक्रमातील मुख्य आकर्षण ठरले.