जातीवाद सोडून हिदूंनी स्‍वतःची मतपेढी सिद्ध केल्‍यासच हिंदूंचे अस्तित्‍व टिकेल ! – कालीचरण महाराज

चंपाषष्ठीनिमित्त कालीचरण महाराज यांच्या हस्ते पुणे येथे महाआरती संपन्न !

कालीचरण महाराज

पुणे – पालघर साधूंवरील आक्रमण असो की, कर्नाटकमध्ये झालेल्या साधूंच्या हत्या असो किंवा कात्रजमध्ये झालेले संतांवरील आक्रमण असो या सगळ्या घटनांचे कारण आहे हिंदु समाजामध्ये एकी नाही ! हिंदू समाज एकत्रित येणे आवश्यक आहे. सडक्या जातीवादामुळे, वर्णवादामुळे, तसेच भाषावाद आणि प्रांतवाद यांमुळे हिंदु एकत्र येत नाहीत. जातीवाद सोडून हिंदूंनी स्‍वतःची मतपेढी सिद्ध केल्‍यासच हिंदूंचे अस्तित्‍व  टिकेल. हिंदूंची मतपेटी (व्‍होट बँक) नसल्यामुळे हिंदूंची प्रतिष्ठा नाही, लोकसंख्येने अधिक असणे, हे महत्त्वाचे ठरत नाही, तर लोकसंख्येने मोठी ‘व्‍होटर बँक’ असणे हे महत्त्वाचे ठरते, असे परखड प्रतिपादन कालीचरण महाराज यांनी केले. चंपाषष्ठीनिमित्त कालीचरण महाराज यांच्या हस्ते १८ डिसेंबर या दिवशी श्री. गौरव घोडे यांच्या घरी महाआरती झाली, त्या वेळी ते बोलत होते.