नागपूर येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिक्षकांसाठी प्रथमोपचार व्याख्यान !

प्रात्यक्षिक करून दाखवतांना सौ. दाणी

नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – येथील ज्युपिटर हायस्कूल आणि कनिष्ठ विज्ञान महाविद्यालय खामला येथे १६ डिसेंबरला ‘प्रथमोपचार शिकण्याची आवश्यकता’ या विषयावर हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिक्षकांसाठी व्याख्यान घेण्यात आले.

प्रात्यक्षिक करून बघतांना शिक्षिका

प्रथमोपचाराचे जीवनातील महत्त्व याविषयीची माहिती सौ. मुग्धा सहस्रबुद्धे यांनी प्रास्ताविक परिचयात दिली. ‘प्रथमोपचार पेटी कशी असावी ?’ आणि ‘नाडी कशी तपासावी ?’ हे सौ. स्मिता दाणी यांनी प्रात्यक्षिकासह दाखवले. उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शिक्षिका सौ. वैशाली अघोर यांनी समाजोपयोगी कार्य करत असल्याविषयी हिंदु जनजागृती समितीचे आभार मानले.

व्याख्यान यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक श्री. रामानंद नन्नावरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. ‘विद्यार्थ्यांना याविषयाची माहिती असणे आवश्यक आहे. त्यांच्यासाठी वर्ग चालू करावा’, अशी उपस्थितांकडून मागणी आली.

विशेष : पूर्वसिद्धतेसाठी शाळेतील विद्यार्थ्यांनी साहाय्य केले.