शिक्षण विभागाचा उपक्रम !
पुणे – कोरोना महामारीच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दूरगामी परिणाम झालेले आहेत, पालकांच्या स्थलांतरामुळे शाळाबाह्य मुला-मुलींचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे, तसेच राज्यात बालविवाहांचे प्रमाण वाढत आहे. यासाठी शालेय शिक्षण विभागाने शालेय मुला-मुलींच्या सुरक्षिततेसाठी राज्यातील सर्व माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये मुला-मुलींची सुरक्षितता, निकोप आणि समतामुलक वातावरण निर्माण करण्यासाठी विविध स्तरांवर ‘सखी सावित्री’ समिती स्थापन करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १२५ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने विविध स्तरांवर समित्या गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तसेच समितीचा अहवाल कार्यालयास पाठवण्याच्या सूचनाही विभागीय शिक्षण उपसंचालकांनी दिलेल्या आहेत.