राज्यात ६६१ शाळा अनधिकृत, तर कारवाईविषयी सरकार उदासीन !

शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार !

नागपूर, ११ डिसेंबर (वार्ता.) – राज्यात तब्बल ६६१ अनधिकृत शाळा चालवल्या जात आहेत. या शाळा बंद करण्याचे आणि संबंधितांवर गुन्हा नोंदवण्याचे कागदोपत्री आदेश शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत. प्रत्यक्षात मात्र या शाळांतील केवळ ७८ अनधिकृत शाळा बंद करण्यात आल्या आहेत. राज्यात अद्यापही ५८३ अनधिकृत शाळा चालू आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रात तब्बल १८६ शाळा अनधिकृत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात शाळा अनधिकृत असूनही त्यामधील केवळ १४ शाळा बंद करण्यात प्रशासनाला यश आले आहे. उर्वरित शाळांवर कारवाईची प्रक्रिया चालू आहे. राज्यातील ज्या ७८ शाळा बंद करण्यात आल्या आहेत, त्यांतील ६ सहस्र ३०८ विद्यार्थ्यांचा अन्य शाळांमध्ये समावेश करण्यात आला आहे. गंभीर गोष्ट म्हणजे वर्ष २०१२ पासून या अनधिकृत शाळा असून सद्यिस्थतीला शाळांच्या संचालकांकडून या शाळांना अधिकृतरित्या मान्यता मिळावी, यासाठी शासनस्तरावर प्रयत्न चालू आहेत.