नवी मुंबई – लोकलमधून प्रवास करणार्या तरुणीच्या हातातील भ्रमणभाष खेचून फलाटावर उडी मारून पळालेल्या चोराला पकडण्यासाठी तरुणीने धावत्या लोकलमधून उडी मारली. यात ती गंभीररित्या घायाळ झाली. ही घटना घणसोली रेल्वेस्थानकात घडली. या तरुणीवर वाशीतील फोर्टीस रुग्णालयात उपचार चालू आहेत. या प्रकरणी चोराविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.