नवी मुंबई – ऐरोली येथील अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यासाठी सकल हिंदु समाजाच्या वतीने ९ डिसेंबर या दिवशी सकाळी ऐरोली विभाग कार्यालयावर हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
ऐरोली येथील भूखंड क्र. ११, बी सेक्टर-३ येथील अनधिकृत मशिदीजवळ काही धर्मांधांनी एका हिंदु महिलेला मारहाण केली होती. त्यामुळे या परिसरात महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. परिणामी ‘येथील अनधिकृत मशिदीवर कारवाई करण्यात यावी’, अशी मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी सकल हिंदु समाजाच्या वतीने नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस यांच्याकडे तक्रार केली होती; मात्र त्यांनी याविषयी ठोस कारवाई केली नाही. त्यामुळे हा हिंदु जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. शिव वसाहत, सेक्टर १ येथून सकाळी १० वाजता हा मोर्चा काढण्यात येणार आहे.