मुजावर कॉलनीतील स्फोट कोणत्याही स्फोटक वस्तूमुळे नाही ! – न्याय साहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचा अहवाल

अहवालाविषयी पोलीस आणि स्थानिक नागरिक यांचे दुमत

मुजावर कॉलनीत झालेल्या स्फोटात उध्वस्त झालेली वाहने (संग्रहित चित्र)

कराड, ५ डिसेंबर (वार्ता.) – शहरातील मुजावर कॉलनी येथे काही मासांपूर्वी स्फोट झाला होता. हा स्फोट कोणत्याही स्फोटक वस्तूमुळे झालेला नाही, असा अहवाल न्याय साहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेने दिला आहे. हा अहवाल नुकताच प्राप्त झाल्याची माहिती कराड शहर पोलीस ठाण्याने दिली आहे. स्फोटातील मृतांच्या संख्येमुळे ‘हा स्फोट सिलेंडरचा नव्हता’, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. न्याय साहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेने दिलेला अहवाल खरा मानला, तर ‘एवढा भीषण स्फोट सिलेंडरचा असू शकत नाही’, असे मत पोलीस आणि स्थानिक नागरिक यांनी व्यक्त केले आहे.

या स्फोटामध्ये मुल्ला कुटुंबातील ५ जण गंभीर घायाळ झाले होते आणि मुल्ला पती-पत्नी यांचा मृत्यूही झाला होता. स्फोटाचा आवाज एवढा भीषण होता की, संपूर्ण मुजावर कॉलनीचा परिसर हादरून गेला होता. या घटनेनंतर भाजप आमदार नितेश राणे यांनी घटनास्थळी पहाणी करत संशय व्यक्त केला होता.

संपादकीय भूमिका :

पोलिसांना आवाजाच्या तीव्रतेनुसार ‘हा स्फोट स्फोटक वस्तूंमुळे झालेला आहे’, असे वाटत असेल, तर याचा शोध कोण लावणार ?