मुंबई – संसदेच्या हिवाळी अधिवेशात मराठा आरक्षणाचे सूत्र मांडणार, असे उद्धव ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी म्हटले आहे. त्या पुढे म्हणाल्या की, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड येथे भाजपला मिळालेले यश आश्चर्यकारक आहे; परंतु ते अभिनंदनास पात्र आहेत. लोकांमध्ये जाऊन त्यांनी विश्वास निर्माण केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी जास्तवेळ संसदेत येत नाहीत. त्यांचेच खासदार संसदेत कामकाज होऊ देत नाहीत.