पुणे – अमली पदार्थ तस्कर ललित पाटील पलायन प्रकरणी ससून रुग्णालयातील कर्मचार्यासह कारागृहातील रक्षक आणि समुपदेशक यांना गुन्हे शाखेने कह्यात घेतले आहे. पलायनापूर्वी सुरक्षारक्षकाचा भ्रमणभाष वापरून ललितने अधिवक्ता कांबळे, बलकवडे आणि आरहाना यांच्याशी संपर्क साधला होता. या प्रकरणाचे अन्वेषण करायचे असल्याने पोलीस कोठडी देण्याची विनंती सरकारी अधिवक्ता मंजुश्री इथापे यांनी न्यायालयाकडे केली होती. त्याअन्वये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी शेख (सुरक्षारक्षक) आणि शेवते (रुग्णालयातील कर्मचारी) यांना १ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत, तर समुपदेशक इंगळे यांना कह्यात घेतले. अमली पदार्थ विक्री प्रकरणात ललितसह त्याच्या साथीदारांच्या विरोधात पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई केली असून आरोपींना येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
संपादकीय भूमिकादोषींवर कठोर आणि तात्काळ कारवाई होणे आवश्यक ! |