हिंगोली – येथे २० नोव्हेंबर या दिवशी पहाटे ५ वाजून ९ मिनिटांनी भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता रिक्टर स्केलवर ३.५ इतकी होती. यात कुठलीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही. भूकंपानंतर लोक घाबरून घराबाहेर पडले.
सौजन्य एबीपी माझा
१९ नोव्हेंबरच्या संध्याकाळी अरबी महासागमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. त्याची तीव्रता रिश्टर स्केलवर ४.५ इतकी होती.