कोल्हापूर – लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने कोल्हापूर येथील साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या श्री महालक्ष्मीदेवीची विशेष पूजा बांधण्यात आली होती. या पूजेत देवीला विशेष अलंकार घालण्यात आले होते, तसेच विविध प्रकारच्या फराळांचा नैवेद्य दाखवण्यात आला होता.