‘अग्नीकिरण’ आणि ‘करुणा गौसेवा न्यास’ या संघटनांकडून साहाय्य !
सुरत (गुजरात) – दिवाळीच्या निमित्ताने राजस्थानमधील जैसलमेर येथे पाकिस्तानातून आलेल्या २ सहस्र गरीब हिंदु शरणार्थी कुटुंबांसाठी सुरत येथून कपडे पाठवण्यात आले. यांमध्ये कपड्यांच्या २५० खोक्यांचा समावेश होता. हे साहाय्यकार्य ‘अग्नीकिरण’ आणि ‘करुणा गौसेवा न्यास’ या संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे. ‘पाकिस्तान अन्टोल्ड’ या संघटनेने या साहाय्य कार्याचा व्हिडिओ ‘एक्स’वरून प्रसारित केला.
शरणार्थी पाकिस्तानी हिंदूंना अशा प्रकारे करू शकता अर्थसाहाय्य !ऑनलाईन अर्थसाहाय्य करण्यासाठी संघटनांनी दिलेला त्यांचा ‘यूपीआय आयडी’ पुढीलप्रमाणे : agnikiran@upi, agnikiran@axisbank बँक खात्याचे विवरण- खाते क्रमांक : 50200073025284 बँकेचे नाव : HDFC आय.एफ्.एस्.सी. (IFSC) कोड : HDFC0000003 संघटनेने पुढे म्हटले आहे की, आम्हाला दान केल्यावर त्याचा ‘स्क्रीनशॉट’ आणि संबंधित माहिती [email protected] या पत्त्यावर पाठवावी. जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात दान पाठवायचे असेल अथवा शैक्षणिक प्रकल्पास अर्थसाहाय्य करायचे असेल, तर वरील ई-मेल पत्त्यावरच तुमचा संपर्क क्रमांक पाठवावा. आम्ही तुम्हाला संपर्क करू. |
संपादकीय भूमिकाहिंदुहिताचे कार्य करणार्या अशा संघटनाच हिंदु धर्माची खरी शक्ती होत ! |