कायदा-सुव्यवस्थेचा धाकच नसल्याचे लक्षण !
नवी मुंबई – एच्.पी.सी.एल्. आस्थापनाच्या व्यवस्थापकाने स्वस्तिक लॉजिस्टिक ट्रान्सपोर्ट आस्थापनाची सेवा चांगली नसल्याने त्यांना काळ्या सूचीमध्ये टाकले होते. त्याचा राग आल्याने टँकरचालकाने अन्य साथीदारांसह व्यवस्थापक उदयराज सिंग यांना तुर्भे येथे भरदिवसा रस्त्यामध्ये अडवून बेदम मारहाण केली. तसेच त्यांना जिवे मारण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणी सागर यादव, प्रदीप यादव, रोहित यादव, भोलू यादव यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली आहे.