(म्हणे) ‘भारत काश्मीरमध्ये इस्रायली डावपेच खेळत आहे !’ – मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर महंमद यांचा कांगावा

पाकसमर्थक मलेशियाचा भारतद्वेष !

मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर महंमद

कुआलालंपूर – मलेशियाचे माजी पंतप्रधान महाथिर महम्मद यांनी काश्मीरची तुलना पॅलेस्टाईनशी केली. महाथिर महंमद यांनी प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, भारत काश्मीरमध्ये इस्रायली डावपेच खेळत आहे. ते म्हणाले की, काश्मीरमधील भारताचे वर्तन पॅलेस्टाईनमध्ये इस्रायलसारखे आहे. (भारताने इस्रायलप्रमाणे आक्रमक धोरण अवलंबले असते, तर एव्हाना काश्मीरसह पाकिस्तान भारताचे झाले असते आणि अखंड भारताचे भारतियांच्या स्वप्नाची पूर्तता झाली असती ! काश्मीर विषयावर भारताने इस्रायलप्रमाणेच भूमिका घ्यायला हवी, अशीच सर्वसामान्य भारतियांची अपेक्षा आहे ! – संपादक)  मलेशियाकडून भारताला होणार्‍या विरोधामागे दोन मोठी कारणे असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पहिले कारण म्हणजे मलेशियाने हिंदुद्वेषी झाकीर नाईक याला आश्रय दिल्यानंतर भारताने मलेशियातून पाम तेलाची आयात अल्प केली. तेव्हा त्याचा परिणाम मलेशियाच्या अर्थव्यवस्थेवर झाला. याविषयीचे दुसरे मोठे कारण म्हणजे इस्लामिक देशांचा असा विश्वास आहे की जगाच्या मोठ्या भूभागावर मुसलमानांचे नियंत्रण होते; पण काही शक्तींनी त्या भूमी हिसकावून घेतल्या.