आठवडी बाजारातील ‘अनोळखी’ !

गोव्यासह देशातील प्रत्येक गावात आणि शहरात आठवड्याचा बाजार भरण्याची परंपरा शतकानुशतके चालू आहे. गोव्यात बाजारात स्थानिक शेतकर्‍यांनी पिकवलेली भाजी, फळे आणि फुले यांचा प्रामुख्याने बाजार असतो. कडधान्य जवळच्या दुकानात उपलब्ध असते. त्या गावचे स्थानिक शेतकरी भाजी, फळे आणि नारळ विकून जे पैसे मिळतात, त्यातून कडधान्य कपडे अन् मासे घेऊन आठवड्याची त्यांची आवश्यकता भागवतात. या पद्धतीमुळे पूर्वी स्थानिक गावकरी आणि शेतकरी पर्यायाने संपूर्ण गाव स्वयंपूर्ण असे.

प्रतिकात्मक छायाचित्र

सध्या मात्र या आठवड्याच्या बाजारात विक्रेते म्हणून स्थानिक गावचे लोक न्यून आणि ‘अनोळखी’ चेहरेच अधिक प्रमाणात आढळतात. हे अनोळखी चेहरे अधिक तर फळे आणि भाज्या घेऊन वाटेत, रस्त्याच्या बाजूला किंवा उघड्या भूमीवर त्यांचा पसारा मांडतात. ते कपडेही विक्रीसाठी घेऊन बसतात. ते बहुदा हिंदी भाषिक असतात. पती-पत्नींचे दुकान वेगवेगळे थाटलेले असते. त्यामुळे त्या बाजारात स्थानिकांच्या दुकानातील मालाची विक्री साहजिकच न्यून होते. बाहेरील प्रदेशातून स्थलांतरित झालेले लोक प्रारंभी अशा बाजारात त्यांचे बस्तान मांडतात. तिथेच रात्रीचे वास्तव्य करतात. तेथील सार्वजनिक नळाचा वापर करतात. तिथेच झोपतात आणि घाण करतात. यामध्ये बांगलादेशी, पाकिस्तानी आणि म्यानमारचे घुसखोर रोहिंग्या असण्याची दाट शक्यता आहे; कारण ‘यांपैकी काहींची नावे कालांतराने चोरी किंवा दंगे करण्यात पटाईत असणार्‍यांमध्ये आहेत’, असे लक्षात येते.

दुर्दैवाने अशांची कुणीही चौकशी करत नसल्याने त्यांचे चांगलेच फावते. स्थानिकांनाही किंमत देत नाहीत; उलट बहुतेक वेळा वाद घालून स्थानिकांशी गैरवर्तन करतात. हीच स्थिती भारतात थोड्या फार प्रमाणात सर्वत्रच असणार आहे. या संकटाचे गांभीर्य लक्षात घेतले पाहिजे. यातूनच पुढे विविध प्रकारचे ‘जिहाद’ निर्माण होतात. स्थानिक ग्रामपंचायत आणि नगरपालिका यांनी पोलिसांचे साहाय्य घेऊन प्रत्येक आठवड्याच्या बाजारातील विक्रेत्यांचे आधारकार्ड आदी ओळखपत्रांच्या सत्यतेची कसून तपासणी करणे आवश्यक आहे. आठवडी बाजारातील अनोळखी व्यक्तींचा मागोवा घेऊन त्यांच्या प्रवेशाचा मार्ग कठोरपणे बंद केला, तर पर्यायाने देशातील घुसखोरी उघडकीस येऊन होऊन देशाचे अनेक संकटांपासून रक्षण होईल, हे लक्षात घेतले पाहिजे !

– श्री. श्रीराम खेडेकर, बांदोडा, फोंडा, गोवा.