सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद !
पुणे – सेनापती बापट रस्त्यावरून पी.एम्.पी.एम्.एल्.ची बस चिंचवडला चालली होती. त्या वेळी बसचालक सावंत याने एका चारचाकी वाहनाच्या जवळून गाडी घेतली. त्याचा जाब वाहनचालकाने सावंत याला विचारला. त्या वेळी रागाच्या भरात सावंत याने गाडी उलट दिशेने चालवत १० ते १५ वाहनांना जोरदार धडक दिली; मात्र कोणतीही मोठी दुर्घटना घडली नाही. या प्रकरणी सावंत याच्या विरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा चतु:श्रृंगी पोलिसांनी नोंद केला आहे. (छोट्या छोट्या कारणांवर संपत जाणारा संयम इतरांच्या जिवावर बेततो, हेही लक्षात न घेणारा समाज सिद्ध होणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांचे अपयशच आहे ! सुसंस्कारी समाज सिद्ध होण्यासाठी धर्मशिक्षणाची आवश्यकता आहे ! – संपादक)