हिंदु समाजाची एकवाक्यता-एकसंघता हे हिंदु समाजाचे वैशिष्ट्य आहे ! – पू. भिडेगुरुजी

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीची आज समाप्ती

पू. संभाजीराव भिडे गुरुजी

सांगली, २३ ऑक्टोबर (वार्ता.) – श्री दुर्गामाता, गोमाता उपासना यांची उपासना म्हणजेच भारतमातेची उपासना होय. निसर्गात ज्याप्रकारे विविधता आहे, तशाच प्रकारे आपला देशही बहुविध भाषांचा देश आहे. असे असले, तरी हिंदु समाजाची एकवाक्यता-एकसंघता हे हिंदु समाजाचे वैशिष्ट्य आहे, असे प्रतिपादन पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी केले. ते श्री दुर्गामाता दौडीच्या नवव्या दिवशी माधवनगर रस्त्यावरील श्री दुर्गामाता मंदिरासमोर धारकर्‍यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.  २४ ऑक्टोबरला गेले ९ दिवस चाललेल्या श्री दुर्गामाता दौडीची समाप्ती होत आहे.