मुंबई – शहरातील ‘ताज’ या प्रसिद्ध हॉटेलमध्ये बाँबस्फोट करण्याची दूरभाषद्वारे धमकी देणार्या युवकाला पोलिसांनी देहली येथून अटक केली. धरमपाल सिंह (वय ३६ वर्षे) असे त्याचे नाव आहे. कुलाबा पोलीस ठाण्यात धरमपाल सिंह याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
सौजन्य इंडिया टूडे
१४ ऑक्टोबरला रात्री ८.३० वाजता अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षामध्ये दूरभाष करून त्याने ही धमकी दिली. यानंतर पोलीस आणि बाँबशोधक पथक यांनी तात्काळ हॉटेल अन् हॉटेलचा परिसर यांची पडताळणी केली; मात्र यामध्ये काहीही आक्षेपार्ह आढळले नाही. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षात दूरभाष करण्यापूर्वी त्याने २८ वेळा मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात दूरभाष केला असल्याचे पोलिसांना अन्वेषणात आढळून आले. धरमपाल सिंह याने अशा प्रकारे दूरभाष का केला ? याची चौकशी पोलीस करत आहेत.