श्राद्धकर्मात येणार्‍या अडचणी दूर होण्‍यासाठी नामजपाचे मंडल घालून नामजप केल्‍यावर श्राद्धविधी निर्विघ्‍नपणे पार पडणे

कु. निधी देशमुख

१. श्राद्धविधी ठरल्‍यावर कुटुंबियांना अडचणी येणे : ‘माझे वडील श्री. श्‍याम केशव देशमुख (आध्‍यात्मिक पातळी ६१ टक्‍के, वय ७२ वर्षे) हे १६.९.२०२२ या दिवशी आश्रमात होणार्‍या सामूहिक श्राद्धविधीमध्‍ये सहभागी होऊन श्राद्ध करणार होते. श्राद्धविधी ठरल्‍यापासून म्‍हणजे, १४.९.२०२२ पासून आम्‍हाला विविध अडचणी येऊ लागल्‍या. त्‍यात महत्त्वाच्‍या अडचणी म्‍हणजे, आम्‍हा तिघांना (आई, सौ. क्षिप्रा श्‍याम देशमुख (आध्‍यात्मिक पातळी ६२ टक्‍के, वय ६८ वर्षे), मी आणि भाऊ (श्री. निषाद देशमुख (आध्‍यात्मिक पातळी ६३ टक्‍के, वय ३५ वर्षे) यांना) अकस्‍मात् हाता-पायांत, तसेच पूर्ण शरिरात वेदना होणे, पुष्‍कळ थकवा येणे, निरुत्‍साह जाणवणे, असे त्रास होऊ लागले. १५.९.२०२२ या दिवशी निषादच्‍या दोन्‍ही पायांत इतक्‍या वेदना होत होत्‍या की, श्राद्धासाठी सिद्धता करणे त्‍याला शक्‍य होणार नव्‍हते. ‘माझी अवेळी मासिक पाळी चालू होते कि काय ?’, असे वाटून मला त्‍याविषयी काळजी वाटू लागली.

२. श्राद्धविधी निर्विघ्‍नपणे पार पडण्‍यासाठी कागदावर त्रास लिहून त्‍याला नामजपाचे मंडल घालणे आणि नामजप करण्‍यामुळे अडचणी दूर होणे : त्‍यानंतर आम्‍ही कागदावर दत्तगुरूंच्‍या ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ॐ ।’, या नामजपाचे मंडल काढून त्‍याच्‍यात आम्‍हा सर्वांना होणार्‍या त्रासांचा त्‍यात उल्लेख करून ‘असे त्रास होऊ नयेत, श्राद्धविधीत अडथळे येऊ नयेत, सर्वांना शारीरिक आणि मानसिक स्‍वास्‍थ्‍य लाभावे अन् विधी भावपूर्ण व्‍हावा’, अशी प्रार्थना लिहिली. नंतर डॉ. अजय जोशी (आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के, वय ६७ वर्षे) यांना संपर्क करून ‘विधीमध्‍ये अडचणी येऊ नयेत; म्‍हणून कुठला नामजप करायचा ? तो किती काळ करायचा ?’, याविषयी विचारून घेतले. त्‍यांनी सांगितलेले नामजप केल्‍याने विधीमध्‍ये अडचणी आल्‍या नाहीत.

३. श्राद्धविधी भावपूर्ण होऊन विधीस्‍थळावर पूर्वज, ऋषी-मुनी आणि देवतांचे अस्‍तित्‍वसुद्धा जाणवले.’

– कु. निधी देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक