पूर्वजांचे त्रास दूर होण्‍यासाठी पितृपक्षात दत्ताचा नामजप, प्रार्थना आणि श्राद्धविधी करा !

साधकांना सूचना

 १. दत्ताचा नामजप करणे

‘सध्‍या अनेक साधकांना अनिष्‍ट शक्‍तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (२९ सप्‍टेंबर ते १४ ऑक्‍टोबर २०२३ या काळात) हा त्रास वाढत असल्‍याने त्‍या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ हा नामजप न्‍यूनतम १ घंटा करावा. नामजप sanatan.org या संकेतस्‍थळावर आणि सनातन चैतन्‍यवाणी अ‍ॅपवर उपलब्‍ध करण्‍यात आला आहे.

नामजपासाठीची लिंक – https://shorturl.at/inwLR

सनातन चैतन्‍यवाणी अ‍ॅप – https://shorturl.at/opvQ1

जे साधक स्‍वतःला होत असलेला अनिष्‍ट शक्‍तींचा त्रास दूर होण्‍यासाठी नामजपादी आध्‍यात्मिक उपाय करतात, त्‍यांनी त्‍यांच्‍या उपायांच्‍या नामजपाच्‍या व्‍यतिरिक्‍त दत्ताचा नामजप न्‍यूनतम १ घंटा करावा. दत्ताचा नामजप करतांना हातांच्‍या पाचही बोटांची टोके जुळवून अनाहतचक्र आणि मणिपूरचक्र यांच्‍या ठिकाणी न्‍यास करावा.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ

जे साधक आध्‍यात्मिक उपाय करत नाहीत, त्‍यांनी वैयक्‍तिक आवरणे, स्नान, स्‍वच्‍छता-सेवा आदींच्‍या वेळी दत्ताचा नामजप न्‍यूनतम १ घंटा होईल, असे पहावे; मात्र पूर्वजांचा त्रास जाणवल्‍यास त्‍यांनीही बसून अन् मुद्रा करून दत्ताचा नामजप करावा.

२. पितृपक्षाच्‍या कालावधीत पूर्वजांच्‍या त्रासांपासून रक्षण होण्‍यासाठी दिवसभरात मधेमधे दत्ताला प्रार्थना करावी.

३. ज्‍या साधकांना शक्‍य असेल, त्‍यांनी पितृपक्षात श्राद्धविधी अवश्‍य करावा.

असे केल्‍याने पूर्वजांचे त्रास तर दूर होतीलच, त्‍यासह साधनेसाठी त्‍यांचा आशीर्वादही मिळेल.’

– (सद़्‍गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३०.८.२०२३)