हिंदु जनजागृती समितीचे निवेदन
शिराळा (जिल्हा सांगली) – देवता, विविध संत हे कोट्यवधी हिंदूंचे श्रद्धास्थान आहेत. प्रत्येक जण धार्मिक भावनेविषयी अत्यंत संवेदनशील असतो. जसे कुणी आपल्या आई-वडिलांना वाईट बोलले, तर ते आपण सहन करू शकत नाही, तसे देवता/संत यांविषयी असते. त्यामुळे रुग्णालयात जिन्यामध्ये थुंकू नये; म्हणून टाइल्स (फरशा) लावणे अयोग्य आहे. तरी शिराळा येथील ‘महानवर बेबी केअर सेंटर’ या रुग्णालयातील जिन्यामध्ये थुंकू नये म्हणून लावण्यात आलेल्या हिंदु देवतांच्या ‘टाइल्स’ (फरशा) काढाव्यात, या मागणीचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘महानवर बेबी केअर सेंटर’चे डॉ. विनायक महानवर यांना देण्यात आले. डॉ. विनायक महानवर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत या फरशा काढण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, हिंदुत्वनिष्ठ कु. स्नेहल मिरजकर, सर्वश्री किरण कुलकर्णी, शरद नायकवडी, संजय पाटील, प्रवीण पाटील, अभयसिंह साळुंखे, रवींद्र पवार, प्रशांत कानकात्रे, सनातन संस्थेच्या सौ. सुरेखा पाटील आणि सौ. मंगल खोत या उपस्थित होत्या.