मुंबई – मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकर पूर्ण होण्यासाठी २७ ऑगस्टपासून महामार्गावरील अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. वाहतूक पोलिसांकडून याविषयीची अधिसूचना घोषित करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणार्या वाहनांना यातून सवलत दिलेली आहे. १६ टनांपेक्षा जास्त क्षमता असलेल्या ट्रक, मल्टीएक्सल, ट्रेलर यांना ही बंदी लागू असणार आहे. २७ ऑगस्ट २०२३ ते २८ सप्टेंबर २०२३ या कालावधीसाठी मुंबई-गोवा महामार्गावर हे बंदीचे आदेश लागू आहेत. या कालावधीत अवजड वाहतूक पर्यायी मार्गांनी वळवली जाणार आहे.
पळस्पे फाटा येथून कोन फाटा येथून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गाचा वापर करून खालापूर येथून पाली-वाकण मार्गे अवजड वाहतूक वळवण्यात येणार आहे.