वृक्षगणनेसाठी ३ कोटी रुपये खर्च करणार ! – नवी मुंबई महानगरपालिका

नवी मुंबई, २७ ऑगस्‍ट (वार्ता.) – नवी मुंबई महानगरपालिकेने वृक्षगणनेसाठी ३ कोटी रुपये खर्च करण्‍याचा निर्णय घेतला आहे. एका झाडामागे किमान १२ ते १८ रुपयांचा खर्च अपेक्षित धरून वृक्षगणनेच्‍या निविदा मागवण्‍यात आल्‍या आहेत, अशी माहिती उद्यान विभागाचे उपायुक्‍त दिलीप नेरकर यांनी दिली.

प्रत्‍येकी ५ वर्षांनी शहरातील वृक्षांची गणना केली जाते; मात्र वर्ष २०१२ नंतर वृक्षगणना करण्‍यात आली नाही. त्‍या वर्षी शहरातील वृक्षांची संख्‍या ९ लाख इतकी होती. वृक्षगणना केल्‍यास शहरातील वृक्षांच्‍या संख्‍येसह दुर्मिळ वृक्ष, औषधी वृक्ष, फुले, फळे यांची माहितीही मिळणार आहे. शहरातील सर्वांत जुन्‍या झाडाचीही माहिती मिळेल.