१७ ऑगस्ट या दिवशी ‘चंद्रयान-३’चे ‘लँडर’ वेगळे होणार !

बेंगळुरू (कर्नाटक) – चंद्राच्या कक्षेत त्याला प्रदक्षिणा घालणारे ‘चंद्रयान-३’ आता चंद्रावर जवळ पोचले आहे. आता ‘चंद्रयान-३’चे  चंद्रापासूनचे अंतर १५३ किलोमीटर ते अधिकाधिक १६३ किलोमीटर आहे. १७ ऑगस्ट या दिवशी ‘चंद्रयान-३’चे लँडर ‘प्रोपल्शन मोड्यूल’पासून वेगळे करण्यात येणार आहे. याच टप्प्यात ‘चंद्रयान-३’च्या प्रवासात महत्त्वाचे पण निर्णायक पालट होणार आहेत. या कक्षेत पोचल्यानंतर ‘चंद्रयान’ लँडरपासून वेगळे करण्याची प्रक्रिया चालू होईल. सर्व काही सुरळीत राहिल्यास २३ ऑगस्ट या दिवशी नियोजित वेळेवर चंद्रयान-३ चंद्रावर उतरेल.