वडगाव शेरी (पुणे) येथे मेट्रो स्‍टेशनचा लोखंडी भाग चारचाकी गाडीवर कोसळला !

पुणे – वडगाव शेरी येथे ‘मेट्रो’च्‍या थांब्‍याचे काम चालू आहे. या स्‍टेशनचा लोखंडी भाग खालून जाणार्‍या एका चारचाकी गाडीवर कोसळला. जिवीत हानी झाली नसली, तरी गाडीची हानी झाली आहे. त्‍यामुळे पुण्‍यातील ‘मेट्रो’च्‍या कामाविषयी संशय व्‍यक्‍त केला जात आहे. ‘महा मेट्रो’ने येरवडा येथे चालू असलेल्‍या थांब्‍याच्‍या कामाची संपूर्ण सुरक्षा पडताळणी करावी, तसेच कामाच्‍या दर्जाची पडताळणी व्‍हावी. या घटनेला कुणाचा निष्‍काळजीपणा कारणीभूत आहे याची चौकशी व्‍हावी, असा नागरिकांचा सूर आहे.

‘महा मेट्रो’चे जनसंपर्क अधिकारी हेमंत सोनवणे म्‍हणाले की, ही घटना नेमकी कशामुळे घडली ? याचे दायित्‍व कुणाकडे आहे ? किती हानी झाली आहे, याची पहाणी अधिकार्‍यांनी केली आहे. मेट्रोचे काम करतांना सुरक्षेच्‍या उपाययोजना केल्‍या आहेत.