मुंबई – पाचोर्याचे शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांच्या समर्थकांनी विरोधात बातमी छापल्याच्या रागातून स्थानिक पत्रकार संदीप महाजन यांना मारहाण केल्याचे वृत्त आहे. या पत्रकाराचे वडील स्वातंत्र्यसैनिक होते आणि त्यांच्या नावाने येथे चौक आहे. त्या चौकातच आमदारांच्या समर्थकांनी त्यांना मारहाण केल्याचे समजते. जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या प्रकरणी केलेल्या बातमीत या पत्रकाराने मुख्यमंत्र्यांवर भाष्य केले होते. त्यानंतर आमदार पाटील यांनी त्यांना संपर्क करून शिवीगाळ केल्याची चर्चा होती. ज्या चौकात त्यांना मारहाण झाली, त्या चौकाला संदीप महाजन यांच्या स्वातंत्र्यसैनिक वडिलांचे नाव आहे.
पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी या घटनेविषयी, ‘आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सत्तेची नशा अशी असते का ? लोकशाही मूल्यांना, स्वातंत्र्यासाठी झिजलेल्या कुटुंबांना देखील सन्मान नसतो का ?’ असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.