पुणे – मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील पुणे येथील चांदणी चौकातील उड्डाणपुलासह रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. १२ ऑगस्ट या दिवशी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते चांदणी चौकातील मार्गांचे लोकार्पण करण्यात येणार आहे. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित रहाणार आहेत. उद़्घाटनानंतर हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी माहिती भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकार्यांनी सांगितले. चांदणी चौकात सातत्याने होणार्या वाहतूक कोंडीवर उपाय निघावा, यासाठी स्थानिक नागरिकांसह लोकप्रतिनिधींकडून मागणी होत होती.