जळगाव सेवाकेंद्रात असलेल्या गुरुपादुकांमधील चैतन्याची आलेली प्रचीती !

१. कोरोना काळात जळगाव येथील एका आस्थापनाचे कर्मचारी जळगाव सेवाकेंद्रात साधकांतील प्राणवायूची (ऑक्सिजनची) पातळी मोजण्यासाठी येणे

सद्गुरु नंदकुमार जाधव

‘कोरोनाची तीव्रता वाढत होती. त्या काळात जळगाव येथील एका आस्थापनाने त्यांच्या काही कर्मचार्‍यांना समाजातील व्यक्तींतील प्राणवायूची (ऑक्सिजनची) पातळी आणि शारीरिक तापमान मोजण्याची सेवा दिली होती. एकदा ते कर्मचारी सनातनच्या जळगाव सेवाकेंद्रात साधकांची तपासणी करण्यासाठी आले होते.

२. आस्थापनाच्या कर्मचार्‍यांनी ‘सेवाकेंद्र असलेल्या परिसरात एकही कोरोना ‘पॉझिटिव्ह’ न आढळणे’, असे सांगणे

तेव्हा मी त्या कर्मचार्‍यांना विचारले, ‘‘या परिसरात कोणी कोरोना ‘पॉझिटिव्ह’ (कोरोनाचा संसर्ग झालेला) आढळले का ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘या परिसरात एकही कोरोना ‘पॉझिटिव्ह’ आढळला नाही; मात्र आम्ही अन्यत्र ज्या परिसरात गेलो, त्या प्रत्येक भागात कोरोना ‘पॉझिटिव्ह’ व्यक्ती आढळल्या.’’

३. ‘सेवाकेंद्रात असलेल्या गुरुपादुकांतील चैतन्यामुळे संपूर्ण परिसर चैतन्यमय झाला आहे’, असे वाटणे

तेव्हा माझ्या मनात लगेच विचार आला, ‘या परिसरात सनातनचे सेवाकेंद्र आहे आणि सेवाकेंद्रात ‘गुरुपादुका’ (महर्षींच्या आज्ञेनुसार बनवलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुका) आहेत. त्यामुळे केवळ सेवाकेंद्रातच नव्हे, तर सेवाकेंद्राच्या सभोवतीचा परिसरही चैतन्यमय झाला आहे. त्यामुळे या परिसरात कोरोना ‘पॉझिटिव्ह’ व्यक्ती आढळली नाही.’

४. गुरुपादुकांचे महत्त्व लक्षात येणे

आजही या सेवाकेंद्रात कोणी नवीन व्यक्ती, धर्मप्रेमी किंवा हिंदुत्वनिष्ठ आले की, ते म्हणतात, ‘‘या सेवाकेंद्रात चांगले वाटते.’’ तेव्हा ‘सनातनचे सेवाकेंद्र आणि सेवाकेंद्रात असलेल्या ‘गुरुपादुका’ यांचे महत्त्व माझ्या लक्षात आले.’

– सद्गुरु नंदकुमार जाधव, धर्मप्रचारक, सनातन संस्था, जळगाव सेवाकेंद्र, जळगाव. (२९.८.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक