सोलापूर येथे २८ मे या दिवशी होणार्‍या ‘हिंदु एकता दिंडी’त मोठ्या संख्येने सहभागी व्हा ! – हिरालाल तिवारी, सनातन संस्था

डावीकडून श्री. सत्यनारायण गुर्रम, श्री. बापू ढगे, श्री. हिरालाल तिवारी, श्री. राजन बुणगे

सोलापूर, २६ मे (वार्ता.) – सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८१ व्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने संस्थेच्या वतीने हिंदु राष्ट्राच्या जागृतीसाठी ‘हिंदु राष्ट्र जागृती अभियान’ राबवण्यात येत आहे. या अभियानाच्या अंतर्गत सनातन संस्थेच्या वतीने रविवार, २८ मे या दिवशी सोलापूर येथे सायंकाळी ५ वाजता ‘हिंदु एकता दिंडी’चे आयोजन करण्यात आले आहे. ही दिंडी सोलापूर येथील बाळीवेस येथून प्रारंभ होऊन चार हुतात्मा चौक येथे समारोप होणार आहे. या फेरीत विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना, आध्यात्मिक संघटना, सामाजिक संघटना, विविध संप्रदाय सहभागी होणार आहेत. तरी संघटितपणाचा संदेश देणार्‍या प्रबोधनपर ‘हिंदु एकता दिंडी’त हिंदूंनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी यांनी पत्रकार परिषदेत केले. या वेळी पद्मशाली ज्ञाती संस्थेचे माजी सचिव श्री. सत्यनारायण गुर्रम, सामाजिक कार्यकर्ते श्री. बापू ढगे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. राजन बुणगे हेही उपस्थित होते. या वेळी श्री. गुर्रम आणि श्री. बापू ढगे यांनीही हिंदूंना मोठ्या संख्येने दिंडीत सहभागी होण्याचे आवाहन केले.

‘हिंदु एकता दिंडी’चा मार्ग  : प्रारंभ बाळीवेस-टिळक चौक-मधला मारुति-माणिक चौक-दत्त चौक-नवी पेठ-सरस्वती चौक-चार हुतात्मा चौक येथे सांगता